Politics

बिटकॉइन प्रकरणात दिग्गजांचा सहभाग : माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्यांचा आरोप : सर्वंकष चौकशी करण्याची मागणी

Share

बिटकॉइन प्रकरणात अनेक दिग्गजांचा सहभाग असल्याचा गौप्य्स्फोट करत सदर प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून योग्य तपास करावा, तसेच या प्रकरणी गुंतलेल्या नागरिकांचे रक्षण करावे, असे आग्रह माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी केलाय.

हुबळी येथे एका काँग्रेस नेत्याच्या मुलाच्या विवाहसमारंभात सहभागी झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी सदर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बिटकॉइन संदर्भात बोलताना ते म्हणाले, या प्रकारची चौकशी करण्याचा आग्रह केल्यास मुख्यमंत्री ईडी कडे जाण्याचा सल्ला देत आहेत. इतके दिवस ते का गप्प राहिले? असा सवाल करत बिटकॉइन हे एक मोठे प्रकरण असून यामध्ये अनेक जण अडकल्याचे ते म्हणाले. बिटकॉइन संदर्भात केंद्राने चौकशी करून निपक्षपाती तपास करावा, असे सांगितले.

यानंतर हनगल पोटनिवडणुकीसंदर्भात बोलताना त्यांनी या निवडणुकीत काँग्रेसचाच विजय होणार, असा विश्वास व्यक्त केला. सध्या हनगल चा विकास कोण केला? या विषयावर चर्चा ऐकण्यात येत असून मतदार संघात या त्यानंतर मी याबद्दल सांगेन, असा टोला विरोधकांना लगावलाय. डीकेशी यांच्या आप्तस्वकीयांवरील आयटी धाडी संदर्भात त्यांनी नकार देत याबद्दल आपल्याला काहीच माहिती नसल्याचा खुलासा केलाय.