Dharwad

सिद्धरामय्या करत आहेत आपल्या अनुभवावरून माझ्यावर आरोप : मुख्यमंत्री

Share

सिध्दरामय्यांनी स्वतः पैसे वाटले आहेत. आपल्या याच अनुभवावरून ते माझ्यावर पैसे वाट्ल्याचा आरोप करत आहेत, अशी टीका मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केली आहे.

हुबळी शहरात बोलताना ते म्हणाले कि, भाजप पैसे वाटत असल्याचा आरोप सिद्धरामय्या करत आहेत. पैसे वाटण्याचा अनुभव सिध्दरामय्यांचा आहे. त्यांच्या अनुभवामुळे ते आमच्यावर आरोप करत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. नंजनगुडू, गुंडलूपेटे, कुंदगोळ येथे ते काय करत आहेत, हे सर्वांना माहित आहे. ते जेव्हा विरोधी पक्षात असतात तेव्हा त्यांचा हाच ‘डायलॉग’ ‘फिक्स’ असतो. त्यांचा हा ‘स्टॅंडर्ड टेम्प्लेट डायलॉग’ आहे, असा उपहास देखील मुख्यमंत्र्यांनी केला. सिद्धरामय्या यांनी भाजपने जाहीर केलेल्या कोविड लसीकरणासंदर्भात केलेल्या टीकेला प्रत्त्युत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, १०० कोटी लसीकरण कुणी दिले, कुणाला दिले हे उभे राहून सांगायला हवे. केंद्र सरकारने यासाठी आधीच नोंदणी केली होती, असे मुख्यमंत्री म्हणाले.