Belagavi

मॉरल पोलिसिंग आले अंगलट ! मुस्लिम महिला, हिंदू पुरुषाला मारहाण, लूट

Share

धर्मरक्षणाचा कथित ठेका घेतलेल्या काहींना मॉरल पोलिसिंग अर्थात नैतिक पोलिसगिरी करून एका महिलेला व पुरुषाला मारहाण करून लुटणे चांगलेच महागात पडले आहे. याप्रकरणी बेळगाव पोलिसांनी ३ आरोपींच्या मुसक्या आवळल्या असून फरारी १७ जणांचा शोध सुरु आहे.

होय, बेळगावात फिल्मी स्टाईलने नैतिक पोलिसगिरी करून एका महिलेला व पुरुषाला जबर मारहाण करून २० हजाराचा मोबाईल आणि रोख ५० हजार रुपये लुटल्याची घटना १३ ऑक्टोबरला घडली होती. मुस्लिम महिलेसोबत असल्यावरून एका हिंदू पुरुषाला व त्या महिलेला मारहाण करून लुटल्याची ही घटना काहीशा उशिरानेच उघडकीस आली होती. मूळच्या रायबाग येथील हिंदू पुरुष आणि मूळच्या हुक्केरीच्या मुस्लिम महिलेने मध्यवर्ती बसस्थानकावर उतरल्यानंतर रिक्षा पकडून चालकाला कुठल्यातरी गार्डनला घेऊन जाण्याची सूचना केली. रिक्षात बसल्यावर बुरखा घातलेल्या मुस्लिम महिलेच्या कपाळावर त्या पुरुषाने कुंकू लावला. ते पाहून रिक्षाचालक दावल याने त्यांना गार्डनला नेण्याऐवजी अमननगरजवळील निर्जन शेतात नेले. त्या दरम्यान त्याने आपल्या अन्य साथीदारांनाही बोलावून घेतले. शेतात गेल्यावर त्या सगळ्यांनी दोघांना दांडक्याने आणि रॉडने मारहाण केली. मुस्लिम असूनही हिंदू पुरुषाबरोबर का फिरतेस असे दरडावत दोघांनाही बेदम मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्यांच्याकडील २० हजार रु किंमतीचा मोबाईल आणि ५० हजार रु रोख तसेच आधारकार्ड, एटीएम कार्ड काढून घेऊन पोबारा केला. रिक्षाचालकासह एकूण २० जणांनी ही लूटमार केली. फ्लो या हल्ल्यातील जखमी महिलेने बेळगावातील माळमारुती पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. पोलिस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेऊन कसून तपास केला. या प्रकरणातील मुख्य आरोपी रिक्षाचालक दावलसह तिघांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. दावल खतीब, अयूब आणि युसूफ पठाण अशी अटक केलेल्यांची नावे असून फरारी १७ आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. हे सगळे व्यवसायाने रिक्षाचालक असल्याचे समोर आले आहे असे डीसीपी डॉ. विक्रम आमटे यांनी सांगितले. बाईट या कथित मॉरल पोलिसांवर माळमारुती पोलिसांनी भारतीय दंड संहिता १८६०च्या कलम १४३, १४७, १४८, ३२३, ३२४, ३०७, ३५४, ३९५, ५०४, ५०६ आणि १४९ अनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फ्लो