Belagavi

कंग्राळ गल्लीत मातंगी, दुर्गादेवी वार्षिक जत्रा साधेपणाने

Share

बेळगावातील कंग्राळ गल्लीत मंगळवारी श्री मातंगी देवी आणि श्री दुर्गादेवी वार्षिक जत्रा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने परंतु श्रद्धाभक्तिपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.

प्रतिवर्षाप्रमाणे या ही वर्षी आज जय भीम युवक मंडळ आणि गल्लीतील पंचांच्या सहभागाने कंग्राळ गल्लीतील श्री मातंगी देवी आणि श्री दुर्गादेवी वार्षिक जत्रा श्रद्धा-भक्तिपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. यानिमित्त देवींची पालखी मिरवणूक काढण्यात आली.

या संदर्भात ‘आपली मराठी’ला माहिती देताना दुर्गेश मेत्री यांनी सांगितले की, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने श्री मातंगी देवी आणि श्री दुर्गादेवी वार्षिक जत्रा साजरी करण्यात येत आहे. गेली २ वर्षे कोरोना महामारीच्या थैमानामुळे जत्रा साजरी करण्यात आली नव्हती. परंतु सध्या कोरोना संसर्ग कमी झाल्याने गल्लीतील सर्व भक्तांनी मिळून साधेपणाने जत्रा साजरी केली.

दरम्यान, या जत्रेनिमित्त भक्तांना प्रसादवाटप करण्यात आले. त्याचा परिसरातील भक्तांनी लाभ घेतला.