Belagavi

अरबाज मुल्ला मृत्यू प्रकरण सीबीआय किंवा सीओडीकडे सोपवा : राजू सेठ

Share

खानापूर येथे झालेल्या अरबाज मुल्ला या युवकाच्या मृत्यूचे प्रकरण तपासासाठी सीबीआय किंवा सीओडीकडे सोपवावे अशी मागणी काँग्रेस बेळगाव महानगर जिल्हाध्यक्ष राजू सेठ यांनी केली आहे.

बेळगावात मंगळवारी पत्रकारांशी बोलताना राजू सेठ म्हणाले, अरबाजच्या मृत्यूने मुल्ला कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. यापुढे अशा घटना घडू नयेत यासाठी खबरदारी घेण्याची गरज आहे. केवळ खानापूरपुरताच हा विषय नाही तर संपूर्ण देशातच अशा घटना घडत आहेत. त्यामुळे या प्रकरणाचा तपास सीबीआय किंवा सीओडीकडे सोपवून मुल्ला कुटुंबियांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी राजू सेठ यांनी केली.

एकूणच अरबाज मुल्ला याच्या मृत्यू प्रकरणाने सर्वत्र खळबळ उडाली असून अनेक संघटनांनी या प्रकरणाचा तपास गांभीर्याने करण्याची मागणी केली आहे. यावर सरकार आता काय निर्णय घेणार हे पहावे लागेल.