Belagavi

‘बेळगाव ग्रामीण’मध्ये राजकारण पेटले !

Share

बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील राजकारण आता चांगलेच पेटले आहे. . लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या विरोधात माजी . संजय पाटील यांनी अवमानास्पद वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ हेब्बाळकर यांचे पुत्र मृणाल हेब्बाळकर यांनी टीका केली आहे.

बेळगावात शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना मृणाल हेब्बाळकर म्हणाले, बेळगाव ग्रामीण मतदारसंघ अतिवृष्टीच्या प्रदेशात येतो. त्यामुळे दरवर्षी पावसात येथील रस्ते खराब होतातच. पण आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सरकारकडून एसडीपीएच फंडातून सुमारे २२ कोटी रु निधी मंजूर करवून रस्तेदुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. मात्र भाजप नेते त्याठिकाणी श्रमदानाच्या नावाखाली स्वच्छता केल्याचे भासवून राजकीय स्टंट करत आहेत असा आरोप त्यांनी केला.

राज्यात आपल्या पक्षाचे सरकार नसतानाही या मतदार संघातील कुटुंबाची कन्या समजून त्या प्रामाणिकपणे विकास करत आहेत. त्यांनी खोट्या प्रचाराला, अफवांना दाद न देता आपले काम सुरु ठेवावे असे आवाहन त्यांनी केले.

एकंदर बेळगाव ग्रामीण मतदार संघातील राजकीय वादात आता आमदारपुत्राने एन्ट्री केल्याने हा व असाच धुमसत राहणार का स्फोटक रूप घेणार हे आगामी काळातच स्पष्ट होणार आहे.