Nippani

निपाणी सार्वजनिक शौचालय कामकाजाविरोधात स्थानिकांचा संताप;नगरपालिका सदस्यांविरोधात नागरिकांचा आक्रोश

Share

निपाणी शहरातील सार्वजनिक शौचालयांचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने, याविरोधात स्थानिक नागरिकांनी नगरपालिका सदस्यांविरोधात नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

निपाणी नगरपालिका व्याप्तीतील वॉर्ड क्रमांक १८ आणि वॉर्ड क्रमांक २५ मध्ये कोणत्याही प्रकारची विकासकामे करण्यात आली नाहीत. तसेच पायाभूत सुविधाही पुरविण्यात आल्या नाहीत. सार्वजनिक शौचालयासाठी सुमारे १२ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. शौचालय निर्मितीसाठी निकृष्ट दर्जाचे सिमेंट, विटा वापरण्यात आल्या आहेत. प्लम्बिंगसह पाण्याचीही व्यवस्था नीट नाही. हे कामकाज नगरपालिका सदस्यांनी केले आहे. सदर कामकाज नियमबाह्य असून दुसऱ्यांच्या नावे निविदा घेऊन निकृष्ट दर्जाचे काम करण्यात आले आहे, असा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

येथील नगरसेवक मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करत असून आतापर्यंत त्यांनी वार्डमधील समस्यांकडे एकदाही पहिले नाही. आपल्या कार्यकर्त्यांची आणि नातेवाईकांची कामे इतकीच नगरपालिका सदस्य करतात. असा आरोप देखील स्थानिकांनी केला आहे.

यावेळी नजीर शेख, कृष्ण मोडीकर, जयवंत पाटील, चंद्र सकट, जरीना चाऊस, अलका भाटले, रेखा मोडीकर, किरण कोडीकर, रिझवान शेख, बाळू मुरगुडे, किशोर सुतार, किशोर धुमाळ, यासीन मालाबाधे यांच्यासह इतर नागरिक उपस्थित होते.