Dharwad

दलितांवरील अन्यायाविरोधात जय भीम संघर्ष समितीचे आंदोलन

Share

दलितांवर मोठया प्रमाणात होत असलेल्या अत्याचाराच्या विरोधार्थ हुबळी येथील जय भीम संघर्ष समितीच्यावतीने आंदोलन छेदत निदर्शने करण्यात आली.

हुबळी येथील तहसीलदार कार्यालयासमोर झालेल्या आंदोलनात समिती सदस्यांनी दलितांवर होणाऱ्या अन्यायाच्या निषेधार्थ निदर्शने केली.

राज्यात दलितांवर अत्याचार, देवस्थान प्रवेश नाकारणे, अस्पृश्यतेची वागणूक देणे असे प्रकार घडत असून महिला आणि मुलांवरील अत्याचाराचे प्रमाणही वाढले आहे. समाजाचीही ही लाजिरवाणी बाब आहे. अशा पाशवी कृत्यासंदर्भात सरकारने गंभीर विचार करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी तहसीलदारांकडे निवेदनामार्फत करण्यात आली.

या आंदोलनात जय भीम संघर्ष समितीचे राज्य अध्यक्ष बसंत अनंतपूर, राज्य युवा घटकचे अध्यक्ष रमेश कट्टीमनी, फैरोज अहमद, राज्य संघटना संचालक नागराज जालीगिडद, सुरेशकुमार, दास दार्ला, गुरुनाथ मोरबद यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.