Athani

करवेतर्फे प्रवीणकुमार शेट्टी यांचा वाढदिवस

Share

 कन्नडच्या रक्षण आणि संवर्धनासाठी झटणाऱ्या करवे राज्याध्यक्ष प्रवीणकुमार शेट्टी यांचा वाढदिवस उत्साहात पण साध्या  पद्धतीने समाजोपयोगी कार्यक्रम राबवून साजरा करणे प्रशंसनीय आहे असे अथणीचे माजी नगराध्यक्ष रावसाहेब ऐहोळे यांनी सांगितले.

कर्नाटक रक्षण वेदिकेचे राज्याध्यक्ष प्रवीणकुमार शेट्टी यांचा वाढदिवस अथणी तालुका शाखेतर्फे सोमवारी साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. यानिमित्त कृपा आरोग्य संस्थेतील एचआयव्ही पीडित आणि अनाथ मुलांना स्कुल बॅग्ज आणि नोटबुक्सचे वाटप करण्यात आले. फ्लो

कर्नाटक रक्षण वेदिके कन्नडच्या रक्षणासह अनेक सामाजिक उपक्रम राबवत आहे. आजचा त्यांचा उपक्रमही प्रशंसनीय आहे असे माजी नगराध्यक्ष रावसाहेब ऐहोळे यांनी यावेळी सांगितले. बाईट

यावेळी बोलताना सुवर्ण कर्नाटक जनसेवा संस्थेचे अध्यक्ष रवी पुजारी, करवे अथणी तालुकाध्यक्ष अण्णासाहेब तेलसंग आणि महिला शाखेच्या विद्या मरडी यांनी सांगितले की, प्रवीणकुमार शेट्टी हे कन्नडच्या रक्षणासाठी झटत आहेत. त्यांच्या प्रेरणेने कन्नडच्या रक्षणासाठी गावोगावी कार्यकर्ते तयार झाले आहेत. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. बाईट

यावेळी करवे जिल्हा संचालक जगन्नाथ भावने, तालुका सचिव शंकर मगदूम, कुमार बडिगेर, विजय हुद्दार, सिद्दू हंडगी, उदय माकणी, रेणुका गाडीवड्डर आदी उपस्थित होते.