Belagavi

मंत्री होण्यासाठी आ. अभय पाटील सर्व दृष्टीने योग्य : आ. बेनकेंची स्तुतीसुमने

Share

 बेळगाव तालुक्याला एकदाही मंत्रिपद मिळालेले नाही. मंत्री होण्यासाठी . अभय पाटील सर्व दृष्टीने योग्य आहेत. त्यांना मंत्रिपद मिळाल्याने मीही दुःखी आहे असे सांगत . अनिल बेनके यांनी . अभय पाटील यांच्या बाजूने जोरदार बॅटिंग केली.

बेळगावात रविवारी भाजपच्या ३५ नगरसेवकांसोबत संवाद कार्यक्रमात भाग घेतल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना आ. अनिल बेनके म्हणाले, बेळगाव तालुक्याला आजवर एकदाही मंत्रिपद मिळालेले नाही. अभय पाटील ३ वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. एवढेच नाही तर बेळगाव महानगर पालिकेवर इतिहासात प्रथमच भाजप विजयी झाला आहे. त्याला अभय पाटील यांची रणनीती कारणीभूत आहे. त्यांच्या कामाची मीही प्रशंसा करतो. त्यांना मंत्री केले नाही याचे दुःख मलाही आहे. त्यामुळे त्यांना मंत्रिपद द्यावे यासाठी मुख्यमंत्र्यांवर दबाव आणू असे आ. बेनके यांनी सांगितले.

मराठा समाजाला मंत्रिपद दिले नसल्याबाबतच्या प्रश्नावर आ. बेनके म्हणाले, येडियुरप्पा मंत्रिमंडळात मराठा समाजाचा एक मंत्री होता. आता बोम्मई मंत्रिमंडळात एकही नाही. मराठा समाजाला एकतरी मंत्रिपद मिळायला हवे. मी पहिल्यांदाच निवडून आलो असल्याने मंत्रिपदाची आशा नाही असे त्यांनी स्पष्ट केले.

मराठा समाजाला आरक्षण मिळण्याबाबत झालेल्या बैठकीबाबतच्या प्रश्नावर प्रतिक्रिया देण्यास टाळून आ. बेनके म्हणाले, मला या बैठकीबाबत स्पष्ट माहिती नव्हती. त्यामुळे मी त्या बैठकीला गेलो नाही. मराठा समाज प्राधिकरणावर लवकरच अध्यक्ष नियुक्त केला जाईल. शिवाय अनुदानही मंजूर होणार आहे असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

एकंदर, मराठा समाजाला मंत्रिपद मिळाले पाहिजे असे सांगतानाच अभय पाटील यांनाही मंत्रिपद द्यावे अशी मागणी आ. अनिल बेनके यांनी केल्याने चर्चेला नवा विषय मिळाला आहे.