Belagavi

कधीही, कुठलेही पद मागणार नाही : आ. अभय पाटील

Share

बेळगावचा विकास हेच माझे ध्येय आहे. त्यामुळे मी कधीही, कुठलेही पद मागणार नाही. एवढेच काय तर मुख्यमंत्र्यांचे राजकीय सचिवपद किंवा सरकारचे मुख्य प्रतोदपद दिले तरी घेणार नाही असे सांगत . अभय पाटील यांनी आज अप्रत्यक्षपणे मंत्रिपदाची आकांक्षा व्यक्त केली

मुख्यमंत्र्यांचे राजकीय सचिवपद किंवा सरकारचे मुख्य प्रतोदपद दिले तरी घेणार नाही असे सांगत आ. अभय पाटील यांनी मंत्रिपदाची आशा बोलून दाखवली. बेळगावात रविवारी भाजप लोकप्रतिनिधींनी भाजपच्या नवनियुक्त नगरसेवकांशी संवाद साधला. त्यानंतर प्रसारमाध्यमांसोबत बोलताना आ. अभय पाटील यांनी बेळगावचा विकास हेच माझे उद्दिष्ट आहे. त्यामुळे मी कधीही, कुठलेही पद मागणार नाही. एवढेच काय तर मुख्यमंत्र्यांचे राजकीय सचिवपद किंवा सरकारचे मुख्य प्रतोदपद दिले तरी घेणार नाही असे सांगत मंत्रिपदाची आशा बोलून दाखवली.

जलसंसाधन मंत्री गोविंद कारजोळ यांच्यासोबत गुप्त ठिकाणी चर्चा केल्याबाबतच्या पत्रकारांच्या प्रश्नावर आ. पाटील यांनी, हि काहीतरी विशेष होते. म्हणूनच मीच स्वतः कार चालवत त्यांना त्यांच्यासोबत गेलो होतो असे सांगितले. पण कसलाही गौप्यस्फोट त्यांनी केला नाही.

आ. अभय पाटील ३ वेळा निवडून आले आहेत. एवढेच नाही तर भाजपच्या बेळगाव पालिकेवरील विजयात त्यांची भूमिका महत्वाची राहिली आहे. त्यामुळे त्यांना मंत्रिपद दिल्यास बेळगावात पक्ष आणखी मजबूत करता येईल असे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे. मात्र हायकमांड किंवा मुख्यमंत्री कोणाच्या डोक्यावर मंत्रिपदाचा मुकुट चढवितात याची प्रतीक्षा करावी लागेल.