Politics

दिल्ली दौऱ्यात निर्मला, गडकरींना भेटणार : बोम्मई

Share

 राज्यात निपाह व्हायरसचा फैलाव होऊ नये यासाठी खबरदारी घेत आहोत. त्याचे नियंत्रण करण्यासाठी सरकार सिद्ध आहे असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले.

राज्यात ८ जणांना निपाह व्हायरसची लागण झाल्याचे उघडकीस आल्याच्या पार्श्वभूमीवर बेंगळुरात पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले, केरळची सीमा बंद करताना आम्ही लसीकरण आणि चाचण्यांची व्यवस्था केली आहे. निपाह व्हायरस बाबत संपूर्ण माहिती मिळवण्याची सूचना तज्ज्ञांना केली आहे. हा विषाणू कसा पसरतो? त्याला पायबंद घालण्यासाठी काय उपाय केले पाहिजेत याची माहिती देण्याचीसुचना केली आहे.

आपल्या दिल्ली दौऱ्याबाबत माहिती देताना बोम्मई म्हणाले, आज दिल्लीला जाऊन केंद्रिय अर्थमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा करणार आहे. उद्या केंद्रीय मार्ग परिवहनमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेणार आहे. गडकरींसोबत राज्यातील बांधकाम आणि महामार्ग प्रस्तावांसंदर्भात चर्चा करायची आहे. त्याचप्रमाणे केंद्राच्या सहयोगाच्या विविध योजनांना अनुदान देण्यासंदर्भात अर्थमंत्र्यांशी चर्चा करणार आहे. केंद्रीय गृहनिर्माण आणि नगरविकास मंत्र्यांनाही भेटणार आहे. त्याशिवाय आणखी ३-४ केंद्रीय मंत्र्यांना भेटणार आहे. त्याचप्रमाणे केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या कन्येच्या विवाहनिमित्त आयोजित रिसेप्शनमध्येही सहभागी होणार आहे से बोम्मई म्हणाले.

भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा याना भेटण्याचे नियोजन नाही. जोशी यांच्या कन्येच्या विवाहनिमित्त आयोजित रिसेप्शनमध्ये भेटले तर बोलेन. मंत्रिमंडळातील ४ रिक्त स्थाने भरण्याबाबत कसलीही चर्चा यावेळी करणार नाही असे बोम्मई यांनी स्पष्ट केले.

कलबुर्गी महानगरपालिकेत एकत्र येऊ असे माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी याना सांगितले आहे. त्यांनीही स्थानिक नेत्यांशी बोलून निर्णय घेईल असे सांगितले आहे. कलबुर्गी मनपात एकत्र सत्तास्थापनेस त्यांनीही कबुली दिली आहे. बहुतकरून भाजप आणि जेडीएस तेथे सत्ता स्थापन करेल असे मुख्यमंत्री म्हणाले.