Belagavi

लग्नानंतर तीन महिन्यातच विवाहितेचा संशयास्पद मृत्यू

Share

तीन महिन्यांपूर्वी आंतरजातीय    प्रेमविवाह केलेल्या तरुणीचा , संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना , बेळगाव शहरातील ,शहापूर येथील अळवाणं गल्ली येथे घडली आहे .

व्हॉइस ओव्हर : ज्योती लक्ष्मीकांत  यल्लारी (वय १९ ) असे  संशयास्पद मृत्यू झालेल्या विवाहितेचे नाव  आहे .  मुचंडी येथील लक्ष्मीकांत  यल्लारी (वय २३ ) याच्याशी , बसवणं गल्ली शहापूर येथिल ज्योती पोळ   हिच्याशी नोंदणी पद्धतीने ,  तीन महिन्यांपूर्वी आंतरजातीय    प्रेमविवाह झाला होता .  लग्नानंतर हे दोघे  अळवाणं गल्ली येथील एक वाचलीत भाड्याच्या घरात राहत होते . लग्नानंतर या दोघांमध्ये सतत खटके उडत होते .

काल रात्री ज्योतीचा अचानक मृत्यू झाल्याने ज्योतीच्या माहेरच्या लोकांनी , तिच्या नवऱ्यानेच खून केला असावा संशय व्यक्त केला .यासंबंधी मृत ज्योतीच्या मामाने उमेश कदम सांगितले कि , आपल्या बहिणीच्या मुलीला तिच्या पतीने मारले आहे . मृतदेह घरात ठेऊन   त्यानंतर तो फरारी झाला आहे . पोलिसांनी त्यांना तातडीने अटक करावी अशी मागणी केली . त्याचप्रमाणे आणखी एका नातेवाईकाने या प्रकरणी चौघांना अटक करण्याची मागणी केली .

तर मृत ज्योतीची आई लक्ष्मी हिने देखील आपल्या मुलीच्या मृत्यूस जावयालाच जबाबदार धरले आहे . लग्नानंतर तो ज्योतीला मारहाण करीत होता , त्याचप्रमाणे जातीवाचक शिवीगाळ करायचा , अशी माहिती देऊन त्याला तातडीने अटक करावी अशी मागणी केली .

घटनास्थळी , शहापूर पोलिसांनी भेट देऊन पाहणी केली . सीपीआय राघवेंद्र हवालदार , तहसीलदार  आर के कुलकर्णी यांनी जिल्हा  रुग्णालयाच्या शवागाराला भेट देऊन पाहणी करुन माहिती घेतली .

लक्ष्मीकांतला अटक केल्यानंतर तसेच शवविच्छेदन अहवालानंतर ज्योतीच्या मृत्यूमागचे कारण स्पष्ट होणार आहे .