Agriculture

पोलीस व जनतेतील दरी कमी करण्याचा प्रयत्न

Share

: पोलीस म्हणजे भीती, काहीतरी गंडांतर हा जनतेतील भ्रम. पण तो दूर करून सामान्यांसोबत साधेपणाने राहून, त्यांच्यातीलच एक होऊन मने जिंकणारा पोलीस अधिकारी नंदगडात दाखल झाला आहे. नंदगडचे नवे सीपीआय सतीश बाळगोंड यांनी अल्पावधीत ही किमया केली आहे.  

नंदगडचे मंडल पोलीस निरीक्षक म्हणून सतीश बाळगोंड यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. सूत्रे स्वीकारल्यावर लगेचच ते कार्यक्षेत्रातील गावांना भेटी देऊन नागरिकांशी संवाद साधत कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन करत आहेत. त्याचबरोबर शेतात काम करणाऱ्या पुरुष व महिलांना भाताच्या रोपांची नट्टी लावण्यास मदत करत त्यांची मने जिंकत आहेत. शेतकऱ्यांना त्यांच्या कामात मदत करून पोलीस आणि जनतेतील दरी कमी करत आहेत. जनसामान्यांत मिळून-मिसळून रहात कायद्याच्या चौकटीत राहून कार्यक्षेत्रातील १०८ खेड्यांत कायदा व सुव्यवस्था राखण्याचे कार्य ते करत आहेत. एकंदर सीपीआय सतीश बाळगोंड यांचा पोलीस आणि जनतेतील दरी कमी करण्याचा हा स्तूत्य प्रयत्न सध्या खानापूर तालुक्यात चर्चेचा विषय ठरलाय .