Bagalkot

अर्जंट काय आहे? अपना टाइम आयेगा ! जारकीहोळीनी व्यक्त केले मनोगत  

Share

: मुख्यमंत्री होण्यासाठी अजून आमचे वय आहे. जे इच्छुक आहेत ते आधी होऊ देत. मग आम्ही अर्ज घालतो, त्यांच्यासाठी आम्हीही प्रयत्न करतो. एक दिवस आमचाही टाइम येईल, अर्जंट काय आहे? असा सवाल करत काँग्रेस कार्याध्यक्ष . सतीश जारकीहोळी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

: काँग्रेसचा पुढचा मुख्यमंत्री कोण यावरून त्या पक्षात जोरात खलबते सुरु आहेत. या पदाचे इच्छुक असलेले सिद्रामय्या आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्यात यावरून शीतयुद्ध सुरु आहे. त्यात आता त्यांच्या समर्थकांनी उडी घेतली आहे. यासंदर्भात बागलकोट येथे पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना जारकीहोळी यांनी विनोदी शैलीत मनोगत व्यक्त केले. पुढील सीएम सिद्रामय्या, डी. के. शिवकुमार, खर्गे असे त्यांचे-त्यांचे समर्थक म्हणतात. यात चूक काहीच नाही. हे सगळ्याच पक्षात चालते. पण आमचाही दिवस येईल असे सांगत सतीश जारकीहोळी यांनी आपली सीएम पदाची आकांक्षा जाहीर केली.

पुढील सीएम सिद्रामय्या अशी घोषणा करावी का या  प्रश्नावर, हा विषय एवढ्यात येत नाही, आम्ही सगळे सामूहिक नेतृत्वाखाली काम करतो. आता तर अशी घोषणा करण्याचा अधिकार कोणाला नाही. निवडणूकही झालेली नाही. निवडणुकीनंतर आमदारांच्या गटाच्या बैठकीत यावर निर्णय होतो असे ते म्हणाले.

आमचे जमीर अहमद ऑल राऊंडर आहेत. ते सिक्सर मारतच असतात, जिंकायचे म्हटल्यावर बॅट्समन सिक्सर मारतच राहतो. तसे जमीर अहमद सिक्सर मारतात. त्यांना तसे म्हणण्यास कोणी सांगितलेले नाही. सिद्रामय्या मुख्यमंत्री व्हावेत असे त्यांनी प्रेमाने म्हटले असावे असे सांगत जारकीहोळी यांनी अप्रत्यक्षपणे जमीर अहमद यांची पाठराखण केली. बाईट