Belagavi

लॉकडाउनच्या नियमांचा भंग; काकतीत दुकानाला टाळे

Share

लॉकडाउनच्या नियमांचा भंग केल्यावरून काकती येथील एका किराणा दुकानाला टाळे ठोकून दुकानदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोरोना रोखण्यासाठी बेळगाव जिल्ह्यात आणखी आठवडाभर लॉकडाउन वाढवण्यात आला आहे. सकाळी ६ ते १० या वेळेतच व्यापार-वहिवाटीस परवानगी दिली आहे. मात्र काकती गावातील महालक्ष्मी जनरल स्टोअर्स हे दुकान नियमांचे उल्लंघन करून सकाळी १० नंतरही सुरु ठेवण्यात आले होते. याची माहिती मिळताच काकती पोलिसांनी तेथे भेट देऊन पाहणी केली. यावेळी दुकान निर्दिष्ट वेळेपेक्षा अधिक काळ सुरु ठेवल्याचे तसेच दुकानात ४ लिटर मद्ध्यही आढळून आले. या दुकानाला टाळे ठोकून दुकानदार भीमसेन चन्नाप्पा कुंभार (वय ५१) याच्यावर कर्नाटक संसर्गजन्य रोग निवारण कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.