Politics

अरुणसिंग हे  राज्य  भाजपाचे प्रभारी आहेत

Share

अरुणसिंग हे  राज्य  भाजपाचे प्रभारी आहेत.  पक्षाची स्थिती आणि विकासाबद्दल जाणून घेणे त्यांचे कर्तव्य आहे.   त्यांच्या राज्य भेटीचे मी स्वागत करतो असे  मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी स्पष्ट केले.

अरुणसिंग यांच्या १६  जून रोजीच्या  राज्य दौर्‍यासंदर्भातील माध्यमांच्या प्रश्नांना मुख्यमंत्री बीएसवाय प्रतिक्रिया देत होते .  सर्व आमदार व खासदारांशी दोन ते तीन दिवस सल्लामसलत केली आहे .   पक्षाची स्थिती आणि विकासाबद्दल जाणून घेणे त्यांचे कर्तव्य आहे.  त्या दृष्टिकोनातून येत आहे.   मी त्याचे स्वागत करतो.  मी त्यांच्याबरोबर  राहून त्यांना  सर्व  सहकार्य करीन असे सांगितले.

जम्मू-काश्मीर संबंधित कॉंग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया  देताना मुख्यमंत्री म्हणाले कि ,    खोट्या स्वप्नांबद्दल  मी बोलणार नाही.  कॉंग्रेस  कोठे आहे हे शोधण्याची स्थिती सध्या  आहे.  कॉंग्रेसमध्ये नेतृत्वाबाबत संभ्रम आहे.  अशा प्रकारे दिग्विजयसिंगांच्या विधानाला कवडीची देखील किंमत नाही .

खासगी शाळांच्या फीबाबत प्रतिक्रिया व्यक्त  करतांना  मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा म्हणाले कि , मी याबद्दल  शिक्षणमंत्री सुरेश कुमार यांच्याशी बोलेन .  आपली अडचण काय आहे असे  विचारेन ,  कायद्याच्या  चौकटीत जे काही करता येईल ते आपण  करु असे स्पष्ट केले.अनेक विषयांवर मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली .