Agriculture

केंद्रसरकारच्या कृषकविरोधी धोरण विरोधात आज महामार्ग बंदची हाक :  हिरेबागेवाडी टोल नाक्याजवळ महामार्ग रोखून शेतकऱ्यांची निदर्शने 

Share

केंद्र सरकारच्या कृषी सुधारित विधेयकाच्या विरोधात , देशभरात ,शेतकरी नेत्यांनी  पुकारलेल्या, महामार्ग बंद आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी , बेळगावच्या हिरेबागेवाडी टोल नाक्याजवळ राष्ट्रीय महामार्ग 4  रोखून , शेतकऱ्यांनी आंदोलन केले .

शेतकरी  नेते सिध्दगौडा मोदगी सहित विविध कृषक संघटनांच्या नेतृत्वाखाली , आयोजित केलेल्या धरणे सत्याग्रहात , शेतकऱ्यांनी , केंद्र सरकारची तीन कृषी विधेयके करा  , आमची जमीन ,आमचा हक्क , केंद्र सरकारचे  कामगार धोरण रद्द करा , कर्नाटक सरकारचे भूसंपादन दुरुस्ती विधेयक रद्द करावे एपीएमसी कायदा रद्द करावा , एपीएमसी बंद केल्यास आम्ही गप्प बसणार नाही , संविधान बद्ध हक्क द्या असे फलक घेऊन  हे शेतकरी आंदोलन करीत होते . डोक्यावर दगड ठेवून आंदोलन करण्यात आले . यावेळी केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली .  यानंतर महामार्गावर झोपून आपला विरोध व्यक्त जाणाऱ्या महिला आक्रमक बनल्या .

केंद्र सरकारने केलेला कृषी कायदा मागे घ्यावा , या मागणीसाठी गेल्या दोन महिन्यांपासून , शेतकरी दिल्लीत आंदोलन करीत आहेत . पण मोदी सरकारने या आंदोलनाची दखल घेतलेली नाही . यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्याची , देशभरातील महामार्ग रोखून निषेध व्यक्त केले . बेळगावच्या हिरेबागेवाडी   टोलनाक्याजवळ आंदोलनाचे स्वरूप उग्र होऊ लागताच पोलिसांनी त्यांना आवरण्याचा प्रयत्न केला पण यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये शाब्दिक चकमक उडाली . यावेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले .

या आंदोलनामध्ये शेकडो शेतकरी सहभागी झाले होते . शेतकरी नेत्या जयश्री गुरुन्नावर , आयेशा सनदी , अखिल पठाण यांचा समावेश होता .

हिरेबागेवाडी येथील या आंदोलनांचे स्वरुप  तीव्र झाल्याचे दिसून आले .