Politics

सोमवारी मुख्यमंत्री येडियुरप्पा करणार विजापूर गदग आणि बागलकोट जिल्हयातील पुरस्थितीची हवाई पाहणी

Share

उद्या मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा विजापूर गदग आणि बागलकोट जिल्ह्यातील अतिवृष्टी तसेच पुरामुळे झालेल्या नुकसानीची हवाई पाहणी करणार आहेत .दुपारी १२.३० वाजता , अलमट्टीच्या लाल बहादूर शास्त्री जलाशयाला भेट देऊन दुपारी एक वाजता अलमट्टीच्या अतिथीगृहात विजापूर , बागलकोट आणि गदग जिल्ह्यातील मंत्री , आमदार , खासदार,संसद सदस्य , जिल्हाधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याची माहिती विजापूरचे जिल्हाधिकारी पी सुनीलकुमार यांनी दिली .

कोरोनाच्या भीतीमुळे , मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाच्या चारही ठिकाणी , थर्मल स्कॅनिंग आणि ऑक्सिमीटरची व्यवस्था करण्यात आली आहे . सॅनिटायझर तसेच मास्क वापराने अनिवार्य आहे . मुख्यमंत्र्यांची सुरक्षा आणि कार्यक्रमाची पूर्व सिद्धतेच्या पार्श्वभूमीवर , जिल्हा पोलीस वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काल अलमट्टी जलाशयाला भेट देऊन मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेविषयी पोलीस विभागाने योग्य त्या उपाययोजना केल्या आहेत  . अलमट्टीमध्ये , कृष्णा नदीत गंगा पूजन करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी प्रतिसाद दिला नसला तरी ते नियोजित कार्यक्रमाच्या यादीत नाही . पण तरीही गंगापुजनसंबंधी सर्व व्यवस्था करण्यात आली आहे .

अलमट्टी जलाशयात १ लाख , ४५ हजार इतका प्रवाह आहे. , मुख्यमंत्री दुपारी अडीच वाजता अतिवृष्टीमुळे बाधित भागांचे हवाई सर्वेक्षण करुन बेळगावचा दौरा करणार असल्याचे जिल्हाधिकारी  पी सुनीलकुमार यांनी सांगितले .