Belagavi

केंद्राचे भेदभावाचे धोरण ,जिल्ह्यातील   मंत्र्यांची कार्यशैली याबद्दल आ . सतीश जारकीहोळी यांनी केले असमाधान व्यक्त

Share

केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी सरकारवर तीव्र हल्लाबोल केला आहे . पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कर्नाटक प्रेम नाही .  त्यामुळे महापुराची स्थिती भीषण असूनही ती  निवारण्यासाठी ते निधी मंजूर करीत नाहीत . स्वतः मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी विचारल्यावर देखील त्यांनी भरपाई मंजूर केली नाही . जिथे पुराची तीव्रता कमी आहे तिथे अगदी भरभरून निधी मंजूर केला .

सोमवारी , बेळगाव येथे पत्रकारांशी बोलताना केपीसीसी कार्याध्यक्ष आणि आ . सतीश जारकीहोळी यांनी सांगितले कि , राज्यांना भरपाई देताना केंद्र सरकार भेदभावाचे धोरण पाळत  आहे .

मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांनी राज्याच्या  पूर स्थितीसंदर्भात केंद्र सरकारकडे भरपाई मागितली होती . पण त्यांना अत्यंत कमी भरपाई देण्यात आली . पंतप्रधान मोदी  यांनी अत्यल्प नुकसान झालेल्या राज्याना  जास्त भरपाई दिली . असा भेदभाव का असा प्रश्न केला   बेळगाव जिल्ह्यातील मंत्र्यांच्या कार्यशैलीबद्दल प्रतिक्रिया देताना केपीसीसी अध्यक्ष सतीश जारकीहोळी महाले ४ मंत्री चार दिशा . ही कार्य करण्याची पद्धत नाही . समन्वय पाहिजे , अधिकाऱ्यांची बैठक घेऊन चर्चा केल्याशिवायविषय कळणार नाही .

सल्ला सूचना देणे सध्या होणार नाही असे सांगितले . एकंदरीत केंद्राचे भेदभावाचे धोरण ,जिल्ह्यातील   मंत्र्यांची कार्यशैली याबद्दल आ . सतीश जारकीहोळी यांनी असमाधान व्यक्त केले आहे .